केम छो गुजरात !
सहाय्यक अकाउंट्स ऑफिसर म्हणून नैनी ला ऍबसॉरब झाल्या नंतर एक वर्षा नंतर मुंबई रेजिनल ऑफिस आणि मुंबई शिपिंग - कलेअरन्स ऑफिस साठी सहाय्यक इंटर्नल ऑडिटर म्हणून जागा निघाली मी त्या साठी अर्ज केला . मला सिलेक्ट करण्यात आले आणि मी मुंबई ला इंटर्नल ऑडिटर म्हणून आलो ते वर्ष १९८४ होते . नरिमन पॉईंट आजचे यशवंतराव चव्हाण मेमोरियल जवळ आमचे आय टी आय लिमिटेड चे रेजिनल ऑफिस होते त्याचे रेजिनल मॅनेजर मोटवानी होते , अद्मिण मध्ये गोरे सहायाय मॅनेजर , विश्वास , अंबेरनाथ इंजिनीरिंग चे डेप्युटी व सहा मॅनेजर होते . मुंबई रेजिनल ऑफिस च्या अंतर्गत बरेच उप कार्यालय येत होते जसे गोवा ,नागपूर , रायपूर , अहमेदबाद , कोटा म्हणजे महाराष्ट्र , गुजरात , राजस्थान , मध्य प्रदेश हे मुंबई रेजिनल ऑफिस च्या क्षेत्रात येत होते तर मुंबई शिपिंग आणि केअरन्स ऑफिस हे दिल्ली , कलकत्ता , मद्रास सारखे इम्पोर्ट , एक्स्पोर्ट बघणारे कार्यालय होते , मुंबई ला कोशी डेप्युटी मॅनेजर होते त्याच्या खाली , भगत, डिकॉस्ता अधिकारी होते . सी धनशेखर अकाउंट्स ऑफिसर म्हणून नाव नियुक्त झाले होते आणि जंगम , फर्नांडिस ,कृष्णन ,नटराजन , बिंबा , डीजी नंदेश्वर स्टाफ होते . मी दोनी आफिस चा इंटर्नल ऑडिटर होता . हे आफिस नव एक्ससिलसिओर टेलिज जवळ विटी ला होते. मी अर्धा दिवस इकडे तिकडे करीत असे .
ऑडिटर म्हणून कुठे काय भ्रस्टाचार चालला आहे याची मला चांगली जाणीव होती . माझी रिपोर्टींग कॉर्पोरेट आफिस , बंगलोर ला चीफ इंटर्नल ऑडिटर ला होती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिपोर्टींग रेजिवल मॅनेजर ला.
या वेळी मी सामाजिक , शैक्षणिक कार्याला वाहून घ्याचे ठरविले . बहुजन एडुकेशन फौंडेशन ऑफ इंडिया नावाची संस्था काढली , ट्रस्ट म्हणून नोंदणी करून घेतली . व पेरियार रामास्वामी इंग्लिश स्कूल काढली . मी अध्यक्ष होतो , जगझापे सेक्रेटरी , जोधे कोशाध्यक्ष . मूळ भारतीय विचार मंच सुरू केला . वेळ अपौरा पडायला लागला . शाळेला मान्यता मिळवायची होती . माझे मुंबईला राहणे जरुरी होते . मी रेजिनल ऑफिस आफिसर असोसिअन चा अध्यक्ष सुद्धा होता .
नेमके याच वेळी अहमदाबाद सब आफिस चे अप ग्रादशन करून त्याला रेजिनल आफिस बनविण्यात आले . मला अहमदाबाद ला ट्रान्सफर केले गेले , आफिसर अससोसिएशन ने ट्रान्सफर करू नका म्हणून अर्ज दिला . माझे म्हणणे होते मी अकाउंट्स आफिसर आहे , खाली एस्सी अकाऊंट्स आफिसर आहे तो जुनिअर आहे त्याला पाठवा किव्हा मला वर चे प्रमोशन द्या .
अनिच्छेने अहमेदबाद ला गेलो , डबल एस्टॅब्लिशमेंट , डबल खर्च , वरून संस्थेचे , शाळेचे , विचार मंच चे काम सफर होणार मी फार वैतागून गेलो .
अहमेदबाद ला पीडी गुप्ता दिल्ली वरून मॅनेजर म्हणून आले होते . दंडायढपणी अशी अशी मी मॅनेजर बंगलोर वरून , शिव प्रकाश इंजिनेर नाव नियुक्त , हरेंद्र सिंग , पर्सनल आफिसर नाव नियुक्त , शशिकुमार , सब आफिसर इंजिनेर तितलाच . स्टाफ युनिअन स्ट्रॉंग आणि लुढकू बंगलोर ला जॉर्ज फर्नांडिस चा भाऊ आफिसर असूनही अध्यक्ष , मुंबई ला मालंडकर लुढकू नेता , खात्री लुढकू नेता .
अकाऊंट्स ला स्टाफ नाही , ऍडमिन ला नाही . डेली बेसिस वर स्थानीय स्टाफ घ्यायचे ठरले , बापू गजबे अटेंडंट म्हणून घेतले . पुढे गिरधर गजबे अकाउंट्स स्टाफ म्हणून घेतले . दोघेही नंतर चांगल्या नौकरी साठी सोडून गेले , बापू मिलिटरी मध्ये तर गिरीधर गजबे टाटा रिचर्स सेंटर मुंबईला , तिथून ते पुढे महिला विद्यापीठात सहायक रजिस्टर , आता क्लास एक अधिकारी डेप्युटी रजिस्ट्रार आहेत .
अहमेदबाद ला मी मणिनगर येथे परमार यांचे घरी भाड्याने राहत असे . सुशिक्षित कुटुंब , एक मुलगा शिक्षक , दुसरा इंजिनेर , तिसरं दाताचा एम डी डॉक्टर . आमच्या आफिस पासून जवळच ५ मिनिटाचे चालत अनंतरवर . दंडायढपणी , शिवप्रकाश , मी आम्ही त्याच भागात राहायचे , शशिकुमार जरा लांब तर सिंग नदी पलीकडे . युनिअन ला रेजिनल आफिस नको होते आणि बनविले तर युनिट सारखे प्रमोशन द्या असे त्यांचे म्हणणे होते . काम न करणे , पेन डाउन , स्लोव काम , असहयोग असे त्यांचे शास्त्र होते . ते दिवस फार वाईट होते . मोदी मिनीनगर मधूनच निवळडून गेले होते , हिंदू - मुसलमान दंगली ने शहर होरपडून निघाले होते . फार भीतीचे वातावरण होते .
मिल वोर्कर्स च्या गंभीर समश्या होत्या . पी एफ , ग्रातूइटी अडली होती ,मिल बंद झाल्या मुले बेकारी वाढली होती . मी तेव्हा त्यांचे साठी अखिल भारतीय श्रमिक अनयाय निर्मूलन लोक समिती बनविली ती युनिअन म्हणून रजिस्टर करून घेतली व थोडा कामाला लागलो . नवीन काही स्टाफ लागला होता तो आणि काही जुने स्टाफ याना मालंडकर , खात्री पसंद न्हवते तेव्हा त्यांनी मला कार्याध्यक्ष व आमदाबाद चे काँग्रेस चे आमदार राजपूत याना अध्यक्ष बनवून आय टी आय रेजिनल एम्प्लॉयीस काँग्रेस युनियन बनविली . आफिस अससोसिएशन चा अध्यक्ष , स्टाफ युनिअन चा कार्याध्यक्ष असे दोन्ही पद मी भूषविले .
काही दिवसाने मला काँग्रेस एस चे मंत्रीही उन्नी कृष्णांन यांच्या पीए आफिस ला फोन आला . दिल्लीला लगेच या काँग्रेस एस , गुजरात प्रदेश से महामंत्री व्हा , प्रदेश कार्यकारणी बनवा , अध्यक्ष बनवा , निवळणूक लढावा . मी दिल्ली ला गेलो , पिजी गवई , ऍड धांडें , वसुमती , उंनी कृष्ण यांची भेट झाली , गुजरात प्रदेश महामंत्री काँग्रेस एस चे पात्र मला दिले .
फॉर्म वर सही करण्याचे अधिकार दिले , गुजरात एस्सेमबी च्या निवडणूक जवळच होती मी कामाला लागलो बऱ्याच लोकांच्या गाठी भेटी घेतल्या , दहा लोक पार्टी तिकीट साठी अप्रोच झाले . काही जागा लढविल्या तेव्हा पार्टी चा प्रतिनिधी म्हणून मला अहमेदबाद रेडिओ स्टेशन वर लोकांना उद्देशून भाषण करण्या साठी बोलविण्यात आले . तेव्हा मी सुरवात केली केम छो गुजरात !
रेडिओ वर भाषण झाले . निवडणूक झाली , पक्ष्याच्या कामाला लागलो , पीडी गुप्ता रेजिनल मानेजर ने एक दिवस बोलविले , राऊत तुम्हाला त्वरित बंगलोर ला बोलाविले आहे . मुंबई ट्रान्फर !
नेटिविस्ट डी डी राऊत
Comments
Post a Comment